Wednesday, December 19, 2018

भारतीय शेतीतील आव्हाने ?

मेहेरगढ येथील उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक साधनांवरून व पुराव्यावरून असे सिद्ध होते की, भारतीय शेतीची परंपरा ही, इसवी सन पूर्व 8000 वर्षाखालील आहे.

इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापासून चालत आलेली शेती आणि शेतकऱ्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिलेले आहेत. शेती करण्याची पारंपारिक साधनांचा काळाच्या ओघात सतत बदल होत गेला, तसेच शेतीवर आधारित  उद्योगाचाही विकास होत गेला. एकेकाळी जागतिक व्यापार पेठ म्हणून नावाजलेले हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती ही शेतीवर आधारित होती. भारतातील भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिके घेतली जात असत, तर काही ठिकाणी बाहेरून आलेल्या जातीचा वापर केला जात असे. सुरुवातीस भारतीय शेतीचा विकास हा नदीकिनारी असणाऱ्या सुपीक जमिनीवर झालेला दिसून येतो. वरील सर्व  मुद्द्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की, प्राचीन काळात भारताची समृद्धी  शेती व शेतीवर आधारित  उद्योगधंद्यावर अवलंबून होती. 

No comments:

Post a Comment