Sunday, January 27, 2019

सनातन धर्म २

अलोकिक सनातन धर्मा बद्दल आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत. युरोपीय देशातील लेखकाने सनातन धर्माबद्दल अनेक खोट्या गोष्टीचा अपप्रचार करण्यासाठी अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत, यात काही भारतीय लेखकाचाही समावेश आहे. यांचा अंतिम उद्देश्य हिंदू लोकांना आपल्या धर्माबद्दल लाज वाटावी व त्यांनी इतर धर्मात धर्मांतरण करून घ्यावी अशीच आहे.
एक उदाहरण बघा.

महाभारतातील भीष्म बद्दल आपण सर्वजण जाणतो. तो एक अद्वितीय असा योद्धा होता, स्वतः परशुरामाला ही भीष्माला हरवणे शक्य झालेले नव्हते. इच्छा मृत्यूचे भीष्माला वरदान लाभलेले होते. ज्यावेळी महाभारताचे युद्ध चालू होते त्यावेळेस कृष्णाला असे जाणवले की, अर्जुन हा भिष्मा सोबत समोरासमोर युद्ध करण्यास  घाबरत आहे. त्यावेळी कृष्णाने भिष्मा सोबत खरा धर्म काय असते याबद्दल चर्चा करत कालचक्र थांबवून आपल विश्वरूप दाखवले.

भीष्माने ज्यावेळी विष्णूचा अवतार कृष्णाच विश्वरूप पाहिले, त्याचवेळी त्यांनी आपल्या हातातील शस्त्र
 खाली ठेवले.  अर्जुन हे सर्व पाहत होता व युद्ध ही चालूच होते, त्यावेळी अर्जुनाने भीष्मावर बाणांचा वर्षाव केला.


परंतु आपणाला काय माहित आहे, रागाच्या भरात कृष्ण हा रथाचे चाक घेऊन भीष्माच्या अंगावर जात आहे. आणि अर्जुन कृष्णा चे पाय धरून सांगतो मी भीष्मा बरोबर युद्ध करेन पण तू युद्धाचे नियम तोडू नकोस. म्हणजे अनेक लेखकांना हेच सांगायचा आहे की, हिंदू चा देवच युद्धाचे नियम मोडत होता.









 यामध्ये भारतीय लेखक ही मागे नाहीत, काहीनी तर वेद, पुराण, उपनिषद यातील अलोकिक व सखोल ज्ञानास शुल्लक बाब असल्याचा उल्लेख केलेला आहे.  युरोपीय देशातील अनेक महान शास्त्रज्ञाने वेदांचा अभ्यास करूनच अनेक शोध लावलेले आहेत. निकोला टेसला यांनी तर हिंदू धर्म स्वीकारलेला होता.






No comments:

Post a Comment