आहार-निद्रा-भय-मैथुनं च समानमेतत्पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेषो धर्मेण हीनाः
पशुभिः समानाः ॥
पशुभिः समानाः ॥
वरील श्लोकाप्रमाणे मनुष्य आणि इतर प्राणी यात काही फरक आहे का? भोजन, निद्रा, समागम आणि जीवन व्यतीत करणे हे चार मुख्य तत्त्व प्राणी आणि मनुष्यात समान आहेत. मानवाचे धर्माशी संलग्न वागणे हाच यातील मूलभूत फरक आहे. मग धर्म म्हणजे काय ?
सत्येनोत्पद्यते धर्मो दयादानेन वर्धते ।
क्षमायां स्थाप्यते धर्मो क्रोधलोभा द्विनश्यति ॥
इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वी आदिशंकराचार्यांनी धर्माची व्याख्या अशी केली आहे, "समाज व्यवस्था उत्तम राहणे व प्रत्येक मानवाची व प्राणिमात्रांची ऐहिक व पारलौकिक उन्नती होणे या गोष्टी ज्याच्यामुळे सध्या होता तो म्हणजे धर्म."
धर्माशिवाय जीवन म्हणजे प्राणी जीवनच होय, मनुष्य हा विचार करतो व त्याच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करतो मात्र इतर प्राण्यांमध्ये हा गुणधर्म आढळून येत नाही. सनातन धर्माचा मुख्य उद्देश हा मानवाचे अध्यात्मिक उन्नती आहे.
सनातन धर्माची रचना ही वेदांवर वर आधारित आहे. जीवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षने युक्त असेल तोच धर्म.


No comments:
Post a Comment