Wednesday, January 30, 2019

आधी वेता वेदांता


अनुच्या संरचनेत आपण पाहिलेला आहे की, अनुच्या केंद्रकाभोवती असणाऱ्या  कक्षेत एलेक्ट्रोन असतात. प्रत्येक कक्षेतील इलेक्ट्रॉनला, त्या ठिकाणी  बांधून ठेवणारा एक इंटेलिजन्स फोर्स असतो, तसेच अणूची संरचना पाहिल्यास  त्यातील 99.99% जागा रिकामी आहे. या रिकाम्या जागेस ब्राह्मण म्हणजे जागृत उर्जेचा स्त्रोत असे आदीवेता वेदात म्हटले आहे. लहान अनु रेणु पासून ते विशाल आकाशात सर्वत्र ब्राह्मण म्हणजेच जागत ऊर्जा आहे, अशी नोंद सात हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंदूंच्या पवित्र वेदात सापडते.






"Prajnanam brahma" म्हणजे, विश्वातील प्रत्येक गोष्टीची माहिती ब्राह्मणास म्हणजेच जागृत ऊर्जेस आहे. तसेच विश्वातील प्रत्येक गोष्टीची निर्मितीही याच ऊर्जेपासून होते.   आदीवेता वेदांतानुसार ब्राह्मण ही एकच रियालिटी आहे.
सर्वप्रथम महार्शी कष्याप यांनी मूलद्रव्याच्या सूक्ष्म कणास  अनु हे नाव दिले व त्यांनीच असे 108 अनु बद्दल माहिती सांगितली आहे. हिंदू धर्मात 108 उपनिषद आहेत,  प्रत्येक अनु साठी एक उपनिषद. अनु म्हणजे शुद्ध ऊर्जेला बांधून ठेवणारी शक्ती. आधी वेता वेदांतानुसार देव म्हणजे,  अनु मधील 99.99% रिकाम्या जागेत असणारी जागृत ऊर्जा किंवा  क्षेत्र  होय. यात  आसमीत पावर सामावलेली आहे व यामुळेच विश्वातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती आणि एका मुलद्रव्यातून दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर होते.
इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी आदिशंकराचार्यांनी स्थापित केलेली भारतातील सर्वात  प्राचीन मठ व  त्या त्याशी संलग्न असलेली वेद.
ज्योतिर्मठ बद्रीनाथ - अथर्ववेद
शारदा मठ शृंगेरी - यजुर्वेद
गोवर्धन मठ जगन्नाथपुरी - ऋगवेद
कालिका  मठ द्वारका - सामवेद







खऱ्या अर्थाने सर्वप्रथम सनातन हिंदू धर्म समजून घेतले, ते आदि शंकराचार्यांनी. आदि शंकराचार्य एक वंडरबॉय होते. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांना 4 वेद 18 पुराणं आणि 108 उपनिषद चे पाठांतर होते. वैदिक साहित्यातील ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी त्यांनीच भारतातील चार कोपर्‍यात चार मठाची स्थापना करून, वैदिक ज्ञानाचा प्रसार केला. आदि शंकराचार्यांनी केलेल्या भागीरथ प्रयत्नामुळे आज सनातन हिंदु धर्म टिकून आहे. 850 वर्ष परकीय आक्रमणना समर्थपणे तोंड देऊन उभारण्याच आत्मिक बळ मिळालं ते केवळ आदिशंकराचार्यांनी केलेल्या वैदिक ज्ञानाच्या प्रसारामुळे.




Reference :

Ajitvadakayil.blogspot.com

Sanathan sanstha

Wikipedia




Tuesday, January 29, 2019

सनातन धर्म 3

अलौकिक असा सनातन धर्म हा मुख्यत्वे आदिवेता वेदांता, दैवता वेदांता व सांख्य वेदांता यावर आधारित आहे. तर चला पाहू आदिवेता  वेदांता ...
 आदिवेता वेदांतानुसार आपला सुप्रीम क्रियेटर हा ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे जागृत उर्जेचा स्त्रोत  ( कॉन्शसनेस एनर्जी ) होय, जो मनुष्याच्या ज्ञानेन्द्रिय यास जाणवत नाही.
यातूनच विश्वातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती झाली आहे.

"Om Isha vasyam idam sarvam, yat kincha jagatyam jagat." Isa Upanishad.

म्हणजे या सतत बदलणाऱ्या विश्वात जे काही अस्तित्वात आहे त्या प्रत्येकात जागृत ऊर्जा आहे. म्हणजेच ब्राह्मण आहे.

सूक्ष्म पातळीवर पृथ्वीतलावरील प्रत्येक अनु रेणु मध्ये या ऊर्जेचा अस्तित्व असून, मोठ्या पातळीवर या संपूर्ण आकाशात आहे.






वरील अणूची संरचना पाहिल्यास काय आढळून येथे, केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन. केंद्रक आणि कक्षेतील एलेक्ट्रोन या मध्ये जी पोकळी आहे त्यातच अस्तित्व आहे ब्राह्मण म्हणजे जागृत उर्जेचा स्त्रोत.
दुसऱ्या जागतिक महायुद्धात वापरल्या गेलेल्या अनु बॉम्ब मुळे, अणूची संहारक शक्ती सर्वांना परिचयाची आहे.










Sunday, January 27, 2019

सनातन धर्म २

अलोकिक सनातन धर्मा बद्दल आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत. युरोपीय देशातील लेखकाने सनातन धर्माबद्दल अनेक खोट्या गोष्टीचा अपप्रचार करण्यासाठी अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत, यात काही भारतीय लेखकाचाही समावेश आहे. यांचा अंतिम उद्देश्य हिंदू लोकांना आपल्या धर्माबद्दल लाज वाटावी व त्यांनी इतर धर्मात धर्मांतरण करून घ्यावी अशीच आहे.
एक उदाहरण बघा.

महाभारतातील भीष्म बद्दल आपण सर्वजण जाणतो. तो एक अद्वितीय असा योद्धा होता, स्वतः परशुरामाला ही भीष्माला हरवणे शक्य झालेले नव्हते. इच्छा मृत्यूचे भीष्माला वरदान लाभलेले होते. ज्यावेळी महाभारताचे युद्ध चालू होते त्यावेळेस कृष्णाला असे जाणवले की, अर्जुन हा भिष्मा सोबत समोरासमोर युद्ध करण्यास  घाबरत आहे. त्यावेळी कृष्णाने भिष्मा सोबत खरा धर्म काय असते याबद्दल चर्चा करत कालचक्र थांबवून आपल विश्वरूप दाखवले.

भीष्माने ज्यावेळी विष्णूचा अवतार कृष्णाच विश्वरूप पाहिले, त्याचवेळी त्यांनी आपल्या हातातील शस्त्र
 खाली ठेवले.  अर्जुन हे सर्व पाहत होता व युद्ध ही चालूच होते, त्यावेळी अर्जुनाने भीष्मावर बाणांचा वर्षाव केला.


परंतु आपणाला काय माहित आहे, रागाच्या भरात कृष्ण हा रथाचे चाक घेऊन भीष्माच्या अंगावर जात आहे. आणि अर्जुन कृष्णा चे पाय धरून सांगतो मी भीष्मा बरोबर युद्ध करेन पण तू युद्धाचे नियम तोडू नकोस. म्हणजे अनेक लेखकांना हेच सांगायचा आहे की, हिंदू चा देवच युद्धाचे नियम मोडत होता.









 यामध्ये भारतीय लेखक ही मागे नाहीत, काहीनी तर वेद, पुराण, उपनिषद यातील अलोकिक व सखोल ज्ञानास शुल्लक बाब असल्याचा उल्लेख केलेला आहे.  युरोपीय देशातील अनेक महान शास्त्रज्ञाने वेदांचा अभ्यास करूनच अनेक शोध लावलेले आहेत. निकोला टेसला यांनी तर हिंदू धर्म स्वीकारलेला होता.






सनातन धर्म

आहार-निद्रा-भय-मैथुनं  समानमेतत्पशुभिर्नराणाम् 
धर्मो हि तेषामधिको विशेषो धर्मेण हीनाः 
पशुभिः समानाः 

वरील श्लोकाप्रमाणे मनुष्य आणि इतर प्राणी यात काही फरक आहे का?  भोजन, निद्रा, समागम आणि जीवन व्यतीत करणे हे चार मुख्य तत्त्व प्राणी आणि मनुष्यात समान आहेत. मानवाचे धर्माशी संलग्न  वागणे हाच यातील मूलभूत फरक आहे. मग धर्म म्हणजे काय ?








सत्येनोत्पद्यते धर्मो दयादानेन वर्धते ।
क्षमायां स्थाप्यते धर्मो क्रोधलोभा द्विनश्यति ॥

जो सत्यातून उत्पन्न होतो दया व दान दिल्याने वाढतो व क्षमा करून स्थिर होतो आणि राग आणि लोभानें नष्ट होतो तो म्हणजे धर्म. 

इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वी आदिशंकराचार्यांनी धर्माची व्याख्या अशी केली  आहे, "समाज व्यवस्था उत्तम राहणे व प्रत्येक मानवाची व प्राणिमात्रांची ऐहिक व पारलौकिक उन्नती होणे या गोष्टी ज्याच्यामुळे सध्या होता तो म्हणजे धर्म."





धर्माशिवाय जीवन म्हणजे प्राणी जीवनच होय, मनुष्य हा विचार करतो व त्याच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करतो मात्र इतर प्राण्यांमध्ये हा गुणधर्म आढळून येत नाही. सनातन धर्माचा मुख्य उद्देश हा मानवाचे अध्यात्मिक उन्नती आहे. 

सनातन धर्माची रचना  ही वेदांवर वर आधारित आहे. जीवांचा  उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षने युक्त असेल तोच धर्म.

Sunday, January 20, 2019

भारतीय शेतीतील आव्हाने, अल्पभूधारक शेतकरी














भारतीय शेतीची सर्वात मोठी समस्या ही  आताचा शेतकरी हा अल्पभूधारक झाला आहे. भारतात शासकीय पातळीवर शेती विषयक मोजदाद नोंद, लागवडीखालील क्षेत्र, ओलिताखालील क्षेत्र, पडीक जमीन इत्यादी ची गणना 1970 पासून चालू आहे.

1970- 71 च्या शेतीविषयक गणनेनुसार , प्रत्येक भारतीय शेतकऱ्याकडे सरासरी  2.28 हेक्टर जमीन होती. हेच प्रमाण 1995 -96 मध्ये 1.82 हेक्टर आहे. 2010 च्या शेतीविषयक गणनेनुसार एकूण 70 टक्के भारतीय शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. म्हणजे आज घडीला 70 टक्के भारतीय शेतकरी अल्पभूधारक आहेत.















भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 44 टक्के क्षेत्रावर अल्पभूधारक शेतकरी शेती करतात, आणि देशातील अन्नधान्याच्या जवळपास सर्व गरजा पूर्ण करतात . अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर मिळणारा नफा मात्र नाममात्र आहे.

भारतीय शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर सर्वप्रथम, अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती सुधारली पाहिजे. देशातील 96% अल्पभूधारक शेतकरी हा ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा अभाव, भांडवलाची कमतरता, लहरी हवामान, बेभरवशाचा मानसून, सुसज्ज बाजारपेठेचा अभाव, शेतीला योग्य बाजार भाव न मिळणे व इतर काही समस्या कडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीचे बियाणांची उपलब्धता करून देणे, हवामानातील बदलाचे अद्यावत माहिती मिळणे, शेतातील यांत्रिकीकरण वाढवणे व शेती विषयक सरकारी धोरणांचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

















भारतीय शेतकरी मागे राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, शेतीची अल्पभूधारक  व त्यामुळे मिळणारे कमी उत्पन्न आहे. अल्प शेतीमुळे शेतकऱ्यांना सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे बी-बियाणे, खते तसेच बैल व शेतीचे अवजारे घेऊन जावे लागते व त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत वाढते. शेतीच्या लहान प्लॉट मुळे पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही, तसेच वडिलोपार्जित जमिनीच्या होणाऱ्या वाटपात बरीशी चांगली जमीन की बांध टाकण्यात जाते.

वरील सर्व बाबींचा विचार करता असे दिसून येते की, अल्पभूधारक शेतकर्‍यांची अवस्था सुधारण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे एकत्रीकरण करून त्यांच्या अधिपत्याखाली  सहकारी तत्त्वावर शेतकरी संस्थाची स्थापना करून शेती करणे हा एक उपाय ठरू शकतो.















सहकारी तत्त्वावर शेती करणे ही संकल्पना साधारण शंभर वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशात, जसे की डेनमार्क, नेदरलँड, बेल्जियम, स्वीडन इत्यादी व इतर देशात झालेली आहे. आज डेन्मार्कमधील प्रत्येक शेतकरी हा कोणत्या ना कोणत्या तरी सहकारी शेतकरी संस्थेचा सभासद आहे. याच संकल्पनेवर आधारित, महाराष्ट्रात अनेक सहकारी व्यवसायांनी भरारी मारली आहे.  सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध व्यवसाय, सहकारी बाजारपेठ, सहकारी पतपेढ्या इत्यादी. महाराष्ट्राला सहकार क्षेत्र हे नवीन नाही, फक्त गरज आहे ती तरुणी युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सहकारी शेतकरी संस्थाची स्थापना करण्याची व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याबाबत जागृत करण्याची.
















अनेक शासकीय योजनेमार्फत सहकारी शेतकरी संस्थांना शेती विषयक अवजारे पुरवली जातात. जसे की ट्रॅक्टर , मळणीयंत्र , पेरणीयंत्र व इतर अनेक शेती विषयक अवजारे  कमीत कमी किमतीत उपलब्ध केली जातात. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत वाढून उत्पन्न वाढीस मदत होईल. बी बियाणे व खतांचा एकत्रित खरेदीमुळे, तेही कमी किमतीत मिळेल. या सर्व व इतर बाबींमुळे, शेतीत लागणाऱ्या मूलभूत भांडवलात कमी येईल.



शेतीतील यांत्रिकीकरणामुळे  शेतीतील उत्पन्न वाढेल, जेणेकरून शेतीवर आधारीत उद्योगधंदे यांचाही विकास होईल. शेतीवर आधारीत उद्योगधंदे मध्ये ग्रामीण तरुणांना रोजगारही भेटेल व यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल.

















Monday, January 7, 2019

भारतीय शेतीतील आव्हाने भाग 2

वैदिक काळातील कुटीर उद्योग

भारतीय प्राचीन ग्रंथ जसे मनुस्मृती अग्निपुराण आणि वृक्षायुर्वेद यामध्ये शेतीविषयक विपुल माहिती मिळते. वैदिक काळातील शेती ही पंचमहाभूतांशी समन्वय साधून केली जात असे. तसेच पिकाच्या निरोगी वाढी साठी कुठलीही रसायनांचा वापर केला जात नसे, त्यामुळे त्या काळातील जमिनीची प्रत ही उत्तम होती. भारतीय उपखंडातील मानसून मुळे वर्षातून दोनदा पिके घेतली जातात.

प्राचीन काळी भारताला सोने की चिडिया असे संबोधले जात  असतं, ती केवळ भारतीय समृद्धीमुळे. प्राचीन काळी भारतीय समृद्धी ही केवळ शेती व शेतीवर आधारित कुटीर उद्योगावर  अवलंबून होती, आणि हे सर्व शक्य होते ते उत्कृष्ट व विपुल जमिनीमुळे. इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वी, परशुरामाने दक्षिण भारतात जमिनीचे विभाजन टाळण्यासाठी फक्त मोठ्या मुलाने लग्न करायचे असे पद्धती काढलेली होती. कालांतराने ही पद्धत बंद पडली, आणि भारतातील सध्या सर्वात मोठी समस्याही अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहे. सध्या 70 टक्के भारतीय शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.





Year
Share of Agriculture (GDP %)
1950-51
56.5
1970-71
45.9
1990-91
34.0
2000-2001
24.7
2006-07
19.55
2007-08
18.51
2008-09
16.4
2009-10
15.7
Source : CSO and Economic Survey 2009
1950 51 मध्ये भारतीय सकल उत्पन्नात शेतीचा वाटा हा 56.5 टक्के होता तर 2009 10 मध्ये 15.7 वर आलेला आहे. 1960 मध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन हरितक्रांती याची  सुरुवात केली, पंजाब हे भारतातील पहिले राज्य त्यासाठी निवडले गेले. हरित  क्रांतीमुळे शेतीतील उत्पन्नाबरोबरच कीडनाशक, कीटकनाशक व रासायनिक खतांचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाला, त्यामुळे जमिनीची प्रत कमी झालेले असून आज पंजाब हे कॅन्सर स्टेट म्हणून ओळखले जाते.

क्रमश......


Wednesday, December 19, 2018

भारतीय शेतीतील आव्हाने ?

मेहेरगढ येथील उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक साधनांवरून व पुराव्यावरून असे सिद्ध होते की, भारतीय शेतीची परंपरा ही, इसवी सन पूर्व 8000 वर्षाखालील आहे.

इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापासून चालत आलेली शेती आणि शेतकऱ्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिलेले आहेत. शेती करण्याची पारंपारिक साधनांचा काळाच्या ओघात सतत बदल होत गेला, तसेच शेतीवर आधारित  उद्योगाचाही विकास होत गेला. एकेकाळी जागतिक व्यापार पेठ म्हणून नावाजलेले हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती ही शेतीवर आधारित होती. भारतातील भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पिके घेतली जात असत, तर काही ठिकाणी बाहेरून आलेल्या जातीचा वापर केला जात असे. सुरुवातीस भारतीय शेतीचा विकास हा नदीकिनारी असणाऱ्या सुपीक जमिनीवर झालेला दिसून येतो. वरील सर्व  मुद्द्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की, प्राचीन काळात भारताची समृद्धी  शेती व शेतीवर आधारित  उद्योगधंद्यावर अवलंबून होती.