Monday, January 7, 2019

भारतीय शेतीतील आव्हाने भाग 2

वैदिक काळातील कुटीर उद्योग

भारतीय प्राचीन ग्रंथ जसे मनुस्मृती अग्निपुराण आणि वृक्षायुर्वेद यामध्ये शेतीविषयक विपुल माहिती मिळते. वैदिक काळातील शेती ही पंचमहाभूतांशी समन्वय साधून केली जात असे. तसेच पिकाच्या निरोगी वाढी साठी कुठलीही रसायनांचा वापर केला जात नसे, त्यामुळे त्या काळातील जमिनीची प्रत ही उत्तम होती. भारतीय उपखंडातील मानसून मुळे वर्षातून दोनदा पिके घेतली जातात.

प्राचीन काळी भारताला सोने की चिडिया असे संबोधले जात  असतं, ती केवळ भारतीय समृद्धीमुळे. प्राचीन काळी भारतीय समृद्धी ही केवळ शेती व शेतीवर आधारित कुटीर उद्योगावर  अवलंबून होती, आणि हे सर्व शक्य होते ते उत्कृष्ट व विपुल जमिनीमुळे. इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वी, परशुरामाने दक्षिण भारतात जमिनीचे विभाजन टाळण्यासाठी फक्त मोठ्या मुलाने लग्न करायचे असे पद्धती काढलेली होती. कालांतराने ही पद्धत बंद पडली, आणि भारतातील सध्या सर्वात मोठी समस्याही अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहे. सध्या 70 टक्के भारतीय शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.





Year
Share of Agriculture (GDP %)
1950-51
56.5
1970-71
45.9
1990-91
34.0
2000-2001
24.7
2006-07
19.55
2007-08
18.51
2008-09
16.4
2009-10
15.7
Source : CSO and Economic Survey 2009
1950 51 मध्ये भारतीय सकल उत्पन्नात शेतीचा वाटा हा 56.5 टक्के होता तर 2009 10 मध्ये 15.7 वर आलेला आहे. 1960 मध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन हरितक्रांती याची  सुरुवात केली, पंजाब हे भारतातील पहिले राज्य त्यासाठी निवडले गेले. हरित  क्रांतीमुळे शेतीतील उत्पन्नाबरोबरच कीडनाशक, कीटकनाशक व रासायनिक खतांचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाला, त्यामुळे जमिनीची प्रत कमी झालेले असून आज पंजाब हे कॅन्सर स्टेट म्हणून ओळखले जाते.

क्रमश......


3 comments:

  1. नवीन पिढी मध्ये शेती विषयक काही जाणीव राहिली नाहीआजकाल नवीन नवीन साधने बाजारात अली आहेत जर आपण आधुनिक पद्धतीचा वापर करून चांगल्या प्रकारे शेती करू शकतो sir तुमचा मुले चांगली माहिती नवीन पिढीला मिळेल अशी आशा thanks

    ReplyDelete
  2. True said, your information shared is really very nice n helpful for everyone

    ReplyDelete