![]() |
| वैदिक काळातील कुटीर उद्योग |
भारतीय प्राचीन ग्रंथ जसे मनुस्मृती अग्निपुराण आणि वृक्षायुर्वेद यामध्ये शेतीविषयक विपुल माहिती मिळते. वैदिक काळातील शेती ही पंचमहाभूतांशी समन्वय साधून केली जात असे. तसेच पिकाच्या निरोगी वाढी साठी कुठलीही रसायनांचा वापर केला जात नसे, त्यामुळे त्या काळातील जमिनीची प्रत ही उत्तम होती. भारतीय उपखंडातील मानसून मुळे वर्षातून दोनदा पिके घेतली जातात.
प्राचीन काळी भारताला सोने की चिडिया असे संबोधले जात असतं, ती केवळ भारतीय समृद्धीमुळे. प्राचीन काळी भारतीय समृद्धी ही केवळ शेती व शेतीवर आधारित कुटीर उद्योगावर अवलंबून होती, आणि हे सर्व शक्य होते ते उत्कृष्ट व विपुल जमिनीमुळे. इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वी, परशुरामाने दक्षिण भारतात जमिनीचे विभाजन टाळण्यासाठी फक्त मोठ्या मुलाने लग्न करायचे असे पद्धती काढलेली होती. कालांतराने ही पद्धत बंद पडली, आणि भारतातील सध्या सर्वात मोठी समस्याही अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहे. सध्या 70 टक्के भारतीय शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.
क्रमश...... | ||||||||||||||||||||


Mast
ReplyDeleteनवीन पिढी मध्ये शेती विषयक काही जाणीव राहिली नाहीआजकाल नवीन नवीन साधने बाजारात अली आहेत जर आपण आधुनिक पद्धतीचा वापर करून चांगल्या प्रकारे शेती करू शकतो sir तुमचा मुले चांगली माहिती नवीन पिढीला मिळेल अशी आशा thanks
ReplyDeleteTrue said, your information shared is really very nice n helpful for everyone
ReplyDelete